😓 मोशन सिकनेस – प्रवासातील नकोसा साथीदार!
प्रवास हा अनेकांसाठी आनंददायी असतो, पण काही लोकांसाठी गाडीत बसणं म्हणजे थेट संघर्ष! जडपणा, उलट्या, डोकेदुखी अशा समस्या काही लोकांना नेहमीच त्रासदायक ठरतात. विशेषतः मोशन सिकनेस असलेल्या लोकांसाठी प्रत्येक ट्रिप ही मानसिक यातना ठरते.
पण आता काळजी करू नका – कारण तुमचं स्मार्टफोनच तुम्हाला या त्रासापासून मुक्त करू शकतो!
📱 KineStop: एक ॲप, हजारो प्रवाशांचा दिलासा
हे कसे काम करते? याची थोड्याक्यात माहिती:
| Points | Details |
|---|---|
| Available: | Google Play Store आणि Apple App Store दोन्ही ठिकाणी हे ॲप मोफत उपलब्ध आहे. ✅ |
| Rating: | गुगल प्ले स्टोअरवर 5.8 रेटिंगसह, एक लाखांहून अधिक डाऊनलोड्स. ✅ |
| Working: | ॲप सुरू केल्यावर स्क्रीनवर कारच्या हालचालींशी संलग्न ठिपके (dots) दिसतात. हे ठिपके मेंदूला दिशादर्शक सिग्नल देतात, जे मळमळ आणि उलट्या रोखण्यासाठी उपयोगी ठरताता. ✅ |
गाडीत बसल्यावर उलटी? ‘ही’ युक्ती फॉलो करा आणि उलट्यांना करा टाटा!
🍏 iPhone वापरकर्त्यांसाठी खुशखबर!
iPhone यूजर्सना वेगळं ॲप इन्स्टॉल करण्याची गरजच नाही! iOS 18 मध्ये हे फीचर आधीच समाविष्ट आहे.
- Settings मध्ये जा
- Accessibility निवडा
- Motion या पर्यायावर क्लिक करा
- Show Vehicle Motion Cues हे ऑन करा
यामुळे iPhone वर डायरेक्ट व्हिज्युअल इशारे (motion cues) मिळतात, जे मोशन सिकनेसवर नियंत्रण ठेवतात.
मोशन सिकनेस हा आता जुन्या काळातला त्रास बनू शकतो – फक्त थोडं awareness आणि योग्य tools वापरा! मोबाईलमधील एक छोटं ॲप किंवा iPhone ची सोपी सेटिंग तुम्हाला आरामदायक प्रवास देऊ शकते.
कार किंवा बसने प्रवास सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे:
- हलके अन्न खा. जड अन्नामुळे उलट्या होण्याची शक्यता वाढते.
- तुमच्या खिशात केशरी टॉफी, लवंगा किंवा काळी मिरी ठेवा, जेव्हा गरज लागेल तेव्हा खाण्यासाठी.
- प्रवासाच्या वेळी वेळोवेळी गाडी थांबवून बाहेरची हवा घ्या. शक्य असल्यास थोडा फिरा.
- मोशन सिकनेसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कारच्या पुढील सीटवर बसावे, ज्यामुळे गुदमरण्याची शक्यता कमी होते.
📢 पुढील अपडेट्ससाठी Viral Meva ला फॉलो करा!