बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या IT Engineer'ला महागात पडलं; Budhwar Peth, Pune

🔔 पुणे, बुधवार पेठ क्राईम:

पुण्यातल्या बुधवार पेठेत (Budhwar Peth) वाढत्या गुन्हेगारीमुळे आता एक नवा प्रकार समोर आला आहे. वेश्याव्यवसायासाठी येणाऱ्या लोकांचे गुप्त व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात आहेत.

आरोपींची माहिती

नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारात आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी एका आयटी इंजिनिअरला धमकावून २० हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न केला.

Budhvarpeth Crime Report

घटना कशी घडली?

१३ जुलै रोजी आयटी इंजिनिअर आपल्या मित्रासोबत बुधवार पेठेच्या परिसरात गेला होता. तो बाईक घेऊन थांबलेला असताना आरोपींनी त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. त्यानंतर त्या दोघांनी त्याचा पाठलाग करत नांदेड सिटी येथील घरी पोहोचले.

घरी पत्नी आणि मुलं नसल्याने आरोपींनी घराजवळच इंजिनिअरला गाठलं आणि धमकावलं. व्हिडीओ दाखवून २० हजारांची मागणी केली. मात्र, त्या तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.

Prostitution in pune

पोलिसांकडून प्रतिक्रिया

पैसे न मिळाल्यामुळे आरोपींनी स्वतःच पोलिसांना फोन केला आणि उलट त्या तरुणाविरोधात तक्रार केली. पोलिसांनीही सुरुवातीला त्या तरुणाचीच चौकशी सुरू केली. मात्र, एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीने सत्य बाहेर आलं.

पोलिसांची कारवाई

खरं प्रकरण समजताच पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. या घटनेनंतर बुधवार पेठ परिसरातील सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

About the author

Dhruv
लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि स…

Post a Comment